शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘मिसिंग लिंक’ने एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:34 IST

खंडाळा घाटातील वाहतूककोंडीला वेगवान व पर्यायी रस्ता म्हणून हा मिसिंग लिंक उभा राहणार

ठळक मुद्देपर्यायी मार्ग : लोणावळा ते खोपोलीदरम्यान बोगदे व उड्डाणपुलाचे काम वेगात सुरूया मार्गामुळे घाटातील वळण व जवळपास ६ किमी अंतर कमी होणारडोंगराचा जवळपास १५ मीटर भागाचे सपाटीकरण करण्याचे काम सुरूअभियांत्रिकी शास्त्राचा आविष्कार

लोणावळा : मुंबई-पुणे या दोन मेट्रो सिटीतील अंतर कमी व्हावे, याकरिता देशातील पहिला वेगवान मार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची निर्मिती केली होती. या द्रुतगती मार्गाला आता २० वर्षे झाले आहेत. या मार्गावरील वाढलेली वाहनांची संख्या, सातत्याने होणारी वाहतूककोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याची क्षमता वाढविण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खालापूर टोल ते कुसगावदरम्यान दोन व्हायाडक व दोन मोठे बोगदे असलेला मिसिंग लिंक बनविण्याचे काम वेगात सुरू केले आहे.खंडाळा घाटातील वाहतूककोंडीला वेगवान व पर्यायी रस्ता म्हणून हा मिसिंग लिंक उभा राहणार आहे. या मार्गामुळे घाटातील वळण व जवळपास ६ किमी अंतर कमी होणार आहे, तसेच वाहतूक सुरक्षित होईलय सोबतच प्रवासातील २० ते २५ मिनिटे वाचतील, असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. सोबतच खालापूर टोल ते खोपोली एक्झिटदरम्यानच्या जुन्या द्रुतगती मार्गावरदेखील दोन पदर वाढवीत मार्गाचे आठ पदरीकरण करण्यात येणार आहे. याकरिता डोंगराचा जवळपास १५ मीटर भागाचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचा मिसिंग लिंक हा २८.७ किमी अंतराचा असून त्याला चौपदरी दोन मार्गिका असतील. मिसिंग लिंकचा पहिला पूल हा ७७० मीटर लांब व ३० मीटर उंचीचा असेल. त्यापुढे चौपदरी दोन अनुक्रमे १.६ मीटर १.१२ किमी अंतराचे बोगदे असतील.....अभियांत्रिकी शास्त्राचा आविष्कारमिसिंग लिंक या मार्गामुळे पावसाळ्यात व इतर वेळी अपघात व वाहतूककोंडीचे प्रमाणदेखील कमी होईल. सध्या कुसगाव परिसरासह ड्युक्स नोजच्या खालील बाजूला बोगदा बनविण्याचे काम सुरू आहे. खोपोली एक्झिटसमोर उड्डाणपुलाकरिता आवश्यक असणारे बिम बनविण्याचे काम सुरू आहे. पुढे काही अंतरावर डोंगराची खोदाई व सपाटीकरण ही कामे सुरू आहेत. हा पूल अभियांत्रिकी शास्त्राचा आविष्कार ठरणार आहे........वायू व ध्वनी प्रदूषण होणार कमी४मिसिंग लिंकचे हे दोन्ही बोगदे प्रत्येकी पाचशे मीटर अंतरावर एका शाफ्टने क्रॉस पॅसेज बोगद्याने जोडलेले असेल जेथून आपत्कालीन स्थितीमध्ये वाहनांना बाहेर पडता येईल. तसेच हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सरासरी दीडशे मीटर अंतरावर असतील. सदरची मिसिंग लिंक हा रस्ते विकास महामंडळ ईपीसी तत्त्वावर बांधणार आहे. ज्यामुळे इंधन व वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी होणार असून, तो झिरो फॅटल्टी कॉरिडोर बनविण्याकरिता उपयोगी ठरणार आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाhighwayमहामार्गMumbaiमुंबईPuneपुणे