खुनाचा प्रयत्न करून बेपत्ता आरोपी अखेर सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:07 IST2021-04-29T04:07:24+5:302021-04-29T04:07:24+5:30

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादीविरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी ...

The missing accused of attempted murder was finally found | खुनाचा प्रयत्न करून बेपत्ता आरोपी अखेर सापडले

खुनाचा प्रयत्न करून बेपत्ता आरोपी अखेर सापडले

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादीविरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी कक्ष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त घालत होते. या वेळी हवालदार विशाल भोरडे व मोसिन शेख यांना गोपनीय खबऱ्यांमार्फत राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले वर्षी जानेवारी महिन्यात खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले आरोपी नसरापूर परिसरात आले आहेत, अशी माहिती मिळाली. त्या माहितीवरून पथकाने सापळा रचून अनिकेत इंगुळकर व काशिनाथ इंगुळकर या दोघांना जेरबंद केले आहेे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली आहे.

Web Title: The missing accused of attempted murder was finally found