शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 20:05 IST

बिबवेवाडीत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस

ठळक मुद्देदिवसेंदिवस महिलांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : घरातील जवळच्या माणसांकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे घराच्याबाहेर मुलींच्या सुरक्षेचे प्रश्नचिन्ह उभे असतानाच आता घरातही त्यांना सुरक्षा मिळत नसल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस महिलांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराचे नवे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. बिबवेवाडीत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीनेच त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. मुलगी नऊ वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. वडील मोलमजुरीचे काम करतात. घरात दुसरी कुठलीही व्यक्ती नाही. मुलगी आणि बाप असे दोघेच राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून वडिलांकडून मुलीला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. फिर्यादी मुलगी झोपल्यानंतर आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पाषाण येथे देखील एका अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यात सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केले. मुलगी खेळत असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार पेठेत घडलेल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच आरोपीने त्या मुलीस ‘तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिचा हात पकडून मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे बोलत अश्लील वर्तन केले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अमन खान (रा. तोफखाना, साईबाबा मंदिराजवळ) यास अटक केली आहे.         

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाRapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळFamilyपरिवारPoliceपोलिस