अल्पवयीन मुलीस पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:10 IST2021-03-06T04:10:54+5:302021-03-06T04:10:54+5:30
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा काटकर याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेले
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा काटकर याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावात मोलमजुरी करून आपल्या दोन मुली व एका मुलाचा सांभाळ करते.
गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सदर महिला कामावरून घरी आली. त्या वेळी तिला १७ वर्षे ११ महिने वयाची मुलगी दिसली नाही. तिचा आजूबाजूला शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. शोध घेत असताना मोठी मुलगी घरी आली. त्या वेळी आईने तिला लहान बहीण मिळून आली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तिने तिचे मोबाईलवर कृष्णा काटकर याने त्याचा मोबाईलवरून मेसेज करून तुमचे मुलीला मी फूस लावून पळवून नेले असल्याबाबत कळविले. म्हणून त्याचेशी संपर्क साधला असता काटकर याने मी तुमची मुलीला पळवून नेले असून मी तिच्याबरोबर तिचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन जबरदस्तीने लग्न करणार असल्याचे सांगितले. म्हणून त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.