शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीत अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात, डॉक्टरसह ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:31 IST

पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात तीन महिन्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात केला.

ठळक मुद्देआरोपींचा तपास चालू असून आत्तापर्यंत कोणालाही अटक नाही. याप्रकरणी डॉक्टर दोषी आढळल्यास संघटनेतून निलंबित करण्यात येईल

वाघोली: वाघोली (ता: हवेली) येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरसह ११ व्यक्तींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील वाघेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेने याप्रकाराबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वाघेश्वर नगर येथे घडली.  फिर्यादींनी दिलेल्या तक्रारी मध्ये सुभाष शिंदे, अंजना शिंदे,कार्तिक गुंजकर,अंबादास साळुके, पंडित डोंगरे, संतोष पवार,अनिल चौघुले, तुकाराम चौघुले, डॉ.अतुल जाधव, डॉ. ज्योती जाधव (सर्व. रा. वाघेश्वर नगर, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष शिंदे यांचा मेहुणा कार्तिक गंजकर याच्यासोबत पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर त्या पीडित मुलीस तीन महिन्याची गर्भवती ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन इतरांच्या मदतीने अतुल जाधव या डॉक्टरांकडे नेले व त्या डॉक्टर दांपत्याकडून त्या पीडित मुलीचा गर्भपात केला गेला. याप्रकरणी ११ जणांवर लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन दिवस उलटूनही कोणासही अटक करण्यात आले नसून पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करत आहेत.......................वाघोली परिसरात अवध्ये गर्भपात केंद्रांवर प्रशासकीय विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे अवध्ये गर्भपात करणा?्या  डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. वाघोली डॉक्टर संघटनेच्या वतीने याप्रकरणी डॉक्टर दोषी आढळल्यास संघटनेतून निलंबित करण्यात येईल.- डॉ. विनोद सातव (डॉक्टर संघटना वाघोली, कार्याध्यक्ष)----------आरोपींचा तपास चालू असून आत्तापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही.  घडलेला प्रकार संवेदनशील असल्याने तपासकार्याला वेळ लागत असून लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल.- सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिसAbortionगर्भपात