शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिकिनीवर ऑडिशन घेत अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 20:58 IST

एका उद्योगपतीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

पुणे : फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी बिकिनीवर ‘ऑडिशन’ घेण्याच्या निमित्ताने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आळेफाटा (ता. जुन्नर) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका उद्योगपतीविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र दगडू गायकवाड (पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 जून 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे येथील एका हॉटेलच्या रूममध्ये  ‘ऑडिशन’ घ्यायची यासाठी गायकवाड याने फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिचे आई-वडील यांना बोलावून घेतले. त्यांनतर हॉटेलच्या एका रूममध्ये गायकवाडने मुलीला नेऊन काही ‘डायलॉग’ बोलण्यास सांगितले. तसेच तिच्या आई-वडिलांना तुम्ही बाहेर बसा. तुम्हाला ती लाजत आहे, असे सांगून त्यांना बाहेर पाठवले. दरम्यान यानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी गायकवाडने मुलीच्या वडिलांना पुन्हा फोन करून मी कामानिमित्त आळेफाटा येथे येत आहे. तेव्हा तुमच्या मुलीचे ‘ऑडिशन’ घेतो आणि तिच्यामध्ये काय सुधारणा झाली आहे का? ते पाहू म्हणत गायकवाड मुलीच्या राहत्या घरी आळेफाटा येथे आला.

आई-वडीलांना बाहेर पाठवून केला अत्याचार-

त्यानंतर मुलीच ऑडिशन घ्यायचाय आहे. असे सांगून मुलीच्या आई-वडिलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. ऑडिशन घेण्याचे बहाण्याने मुलीला कपडे काढण्यास सांगितले व यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता धमकी देऊन गायकवाड तिथून निघून गेला. झालेला प्रकार अल्पवयीन मुलीने आई-वडिलांना सांगितला.

याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीChakanचाकणMolestationविनयभंग