अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 05:30 IST2018-12-08T05:30:32+5:302018-12-08T05:30:34+5:30
धायरी येथे भरदिवसा घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून
पुणे : धायरी येथे भरदिवसा घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. गुरुवारी दिवसा हा प्रकार घडला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले.
धायरेश्वर वस्ती येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. ही युवती एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. आई-वडील नेहमीप्रमाणे मोल-मजुरीच्या कामासाठी सकाळी घराबाहेर पडले होते. ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आला तेव्हा त्याने बहिणीला बेशुद्ध अवस्थेत बेडवर पाहिले. त्याने आई-वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा झाल्या होत्या.