शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा १३० किलोच्या वकीलाशी विवाह; बापाचा प्रयत्न अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:14 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या मदतीमुळे वडिलांचा प्रयत्न फसला आणि आईला दिलासा मिळाला

पती : पती-पत्नीचे भांडण. पतीने रागाच्या भरात पत्नीला घराबाहेर काढले, पण त्याचा राग मनात धरून स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे १३० किलो वजनाच्या ३२ वर्षीय वकिलाशी घाईने लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या मदतीमुळे वडिलांचा प्रयत्न फसला आणि आईला दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या भरोसा सेलला चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

कोंढवा परिसरातील या दांपत्यामध्ये सातत्याने भांडण व्हायचे. एकदा पतीने पत्नीला घराबाहेर काढले होते. अल्पवयीन मुलगी मात्र वडिलांच्या ताब्यात होती. बापाने मुलगी कायद्याने सज्ञान होण्याआधीच स्वतःच्या वकिलाशी तिचे लग्न ठरवण्याचा घाट घातला. मुलगी १८ वर्षांची झाल्याबरोबर रविवारी (दि. १०) घाईने लग्न उरकण्याच्या तयारीत बाप होता. हा वकील १३० किलो वजनाचा आहे. या कटाचा सुगावा लागताच पत्नीने पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार केली. भरोसा सेलने पत्नीचे माहेर असलेल्या चिखली पोलिस ठाण्यात प्रकरण पाठविले. मात्र, लेखी आदेश पोहोचले नाहीत. त्यामुळे मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाच्या अरिफ डॉक्टर आणि सोमशेखर सुदर्शन या सुटीतील संयुक्त पीठाने भरोसा सेलला चार आठवड्यांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. दरम्यान, लग्न करू पाहणाऱ्या वकिलाने उच्च न्यायालयासमोर व्हर्च्युअली उपस्थित राहून कबुली देत हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे सांगितले. त्यामुळे आईला वाटत असलेले मुलीवरील अरिष्ट टळले. या प्रकरणी आईच्या बाजूने ॲड. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. आदिल शेख, ॲड. इरफान उनवाला यांनी काम पाहिले.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नWomenमहिलाCourtन्यायालयPoliceपोलिस