कमला नेहरू रुग्णालयाला किरकोळ स्वरूपाची आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:41 IST2021-04-26T11:40:10+5:302021-04-26T11:41:20+5:30
कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

कमला नेहरू रुग्णालयाला किरकोळ स्वरूपाची आग
ठळक मुद्देअग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल
पुणे: आज सकाळी कमला नेगरु रुग्णालयाच्या तळमजला पार्किंग मध्ये असणाऱ्या टाकाऊ साहित्याला आग लागली होतीं. अग्निशमन दलाचे जवान वेळीच दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझवली.
पार्किंग मध्ये रिकाम्या सलाईन बाटल्या, झाडू, खराटा, प्लास्टिक ड्रम व इतर उपयोगात नसणारे काही साहित्य पेटले होते. त्यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण तातडीने आलेल्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग लागल्याचे लक्षात आल्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला लगेच कळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.