शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

बोपोडीत क्रिकेटच्या भांडणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणावरून चौघांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणावरून चौघांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवरील आयटी पार्क समोरील रोडवर मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली.

याप्रकरणी एका १७ वर्षांच्या मुलाने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश ऊर्फ घुल्या राजू शेट्टी (वय २६, रा. बोपोडी) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मुलगा आणि आरोपी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता आय टी पार्कसमोरील रोडवरील हातगाडीजवळ थांबला होता. त्यावेळी चौघे आरोपी आले. त्यांनी या मुलाला जीवे मारण्याच्या हेतून कोयत्याने वार करुन हाताने मारहाण केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण तपास करीत आहेत.