शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने केली एकाला मारहाण, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 16:45 IST

उजवा हात खांद्यातून निसटला

ठळक मुद्देघराशेजारी होणाऱ्या बांधकामाचे बोलताना सुरु झाला वाद

पिंपरी: आम्हाला घरात जाण्याकरता रस्ता राहणार नाही. तुम्ही चार फुटी रस्ता सोडून बांधकाम करा. असे समजावून सांगताना निर्माण झालेल्या किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  इंदोरी गावच्या हद्दीतील मौजे इंद्रायणीनगर येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

रवींद्र कचरादास कुसळ (वय ३२, रा. इंद्रायणी नगर, ) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. अशोक चौधरी (वय ५५), अजित अशोक चौधरी (वय २७) तसेच एक ४७ वर्षीय महिला (सर्व रा. इंद्रायणी नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कुसळ यांच्या घराशेजारी राहतात. आरोपी त्यांच्या घराच्या बांधकामाकरिता कामाच्या तयारीत होते. या बांधकामामुळे आम्हाला घरात जाण्याकरता रस्ता राहणार नाही, म्हणून पूर्वी ठरलेला चारफुटी रस्ता सोडून बांधकाम कर, असे कुसळ त्यांना समजावून सांगत होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा हात खांद्यात निसटला. त्यांना दुखापत झाली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस