शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Video: राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही; जवळच्या नातेवाइकांचीच भरणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:58 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,

बारामती : सत्तेत सहभागी होण्याआधी हेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे  शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,  अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातेवाईक बाबा महाराज खरतोडे यांनी भरणे यांच्यावर सडकून टिका केली. कळस येथे महावितरण व राज्यसरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर गुरुवारी ( दि.25) आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

 खरतोडे पुढे म्हणाले, ''कळस गावातील अडीअडचणी घेऊन आम्ही वारंवार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेलो. या राज्यमंत्र्यांना लोकांचे काही देणेघेणे नाही. लोक मरतात का जगतात याचे त्यांना काही नाही. लोकांकडे लक्ष देण्यास राज्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र मस्त चालले आहे. वीज कनेक्शन जोडावे यासाठी आम्ही महावितरणचे अधिकारी सुळ यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले. मात्र ते म्हणतात वरून आदेश आला आहे, आम्ही काही करू शकत नाही. वरून आदेश म्हणजे काही स्वर्गातून आला नाही.''

''हे राज्य शेतकऱ्यांसाठी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. मात्र हे राज्य लोकशाही पद्धतीने चालत नाही. हे हुकूमशाही पद्धतीने चालणारे शासन आहे. मागील पंचवार्षिक ला यांचे राज्य होते. तेव्हा हेच राज्यमंत्री म्हणायचे आमचं सरकार निवडून द्या. आम्ही विजबिल पूर्णपणे माफ करू. मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? उसाचे पीक 18 महिन्यांची असते. द्राक्षाचे पीक बारा महिन्याचे डाळिंबाचे पीक देखील बारा महिन्याचे असते. राज्य सरकारने अध्यादेश काढला की दर तीन महिन्यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे  कृषी पंप बंद करून लूट करायची आणि शासनाची तिजोरी भरायची,  असा आरोप राज्यमंत्री भरणे यांचे नातेवाईक खरतोडे यांनी केला.'' 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारmahavitaranमहावितरण