शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, "ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:05 IST

भाजपचं आजचं आंदोलन केवळ राजकारणापोटी आहे. यातून त्यांना आम्ही ओबीसींसोबत आहोत असे दाखवायचे आहे.

लोणावळा : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत करत भाजपकडून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. मात्र याचवेळी ठाकरे सरकारमधील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी फडणवीसांना एक खुली ऑफर देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. भुजबळांनी थेट फडणवीसांना ओबीसी समाजाचे नेतृत्त्व करावं अशी ऑफर देतानाच त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन 'इम्पेरिकल डाटा' मागावा असेही स्पष्टपणे सांगितलं आहे. 

ओबीसी समाजाच्या आरक्षणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी लोणावळ्यात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार छगन भुजबळ, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे  यांच्यासह विविध पक्षांचे नेतेमंडळींच्या उपस्थितीत ही चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

भाजपने ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर सुरु केलेल्या चक्का जाम आंदोलनावर टीकास्त्र सोडताना भुजबळ म्हणाले, भाजपचं आजचं आंदोलन केवळ राजकारणापोटी आहे. यातून त्यांना आम्ही ओबीसींसोबत आहोत असे दाखवायचे आहे. मात्र, कोरोनामुळे घरोघरी जात इंम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य झालं नाही. आणि कोरोना संकट दूर होईपर्यंत इंम्पेरिकल डेटा जमा करणं शक्य नाही. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार व ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं. 

पोलिसांची कोरोनाचे कारण देत ओबीसी चिंतन बैठकीला नोटीस लोणावळ्यात होणाऱ्या सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांनी कोरोना संसर्गाचे कारण नोटीस बजावली आहे. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही ही चिंतन बैठक होणार असं आयोजकांनी सांगितले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण