शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पुण्याच्या किमान तापमानात दुपटीने वाढ; हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:43 IST

२५ वर्षांतील सर्वाधिक जास्त किमान तापमान

ठळक मुद्देरविवार, सोमवारी पावसाची शक्यता  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी पुण्यात सकाळी दाट धुके, पावसाची मधूनच येणारी सर आणि त्यानंतर दिवसभर वाढता उष्मा, असा अनुभव पुणेकरांना आला़. हिवाळ्यात सर्वांत कमी किमान तापमान किती, याची नोंद प्रामुख्याने हवामान विभागाकडून ठेवली जाते़. हिवाळ्यात किमान तापमानातील सर्वाधिक तापमान किती, याची कधीही चर्चा होताना दिसत नाही़. गुरुवारी मात्र पुणे शहराच्या सरासरी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे़. पुणे शहरात गुरुवारी सकाळी २१़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़. ती सरासरीच्या तुलनेत तब्बल १०़६ अंश सेल्सिअसने अधिक होती़ गेल्या १० वर्षांत डिसेंबर महिन्यातील किमान तापमान हे नेहमीच १० अंशांच्या खाली (सिंगल डिजीट) राहत आले आहे़. या डिसेंबरमध्ये आतापर्यंत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते़.अरबी समुद्रात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने यंदा पुणे शहरासह राज्यातील किमान तापमान चढेच राहिले आहे़. गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०१८ रोजी सर्वांत कमी ५़९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले होते़.पुण्यासह अनेक ठिकाणी सकाळी नागरिक फिरायला जाताना नेहमी मफलर, कानटोपी, स्वेटर असा जामानिमा करून घरातून बाहेर पडत असत. डिसेंबर महिनाअखेरीस तर किमान तापमानात मोठी घट झालेली असते़. यंदा मात्र, लोकांना अजूनही स्वेटर, कानटोपी बाहेर काढण्याची गरज पडली नाही़. गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साही पुणेकरांना पावसाची सर अंगावर घेत बाहेर पडावे लागेल़ शहराच्या अनेक भागात सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याचा अनुभव आला. त्यानंतर सकाळी ९ नंतर उन्हाळ्यात जाणवावा, असे उकाडा जाणवत होता.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी व शनिवारी २७ व २८ डिसेंबरला आकाश अंशत: आकाश ढगाळ राहील. २९ व ३० डिसेंबर रोजी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़.....हवामान विभागातील कर्मचाऱ्यांच्या आजवरच्या अनुभवानुसार यंदा प्रथमच डिसेंबरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली दिसत आहे. तसेच, डिसेंबर महिन्यात १० अंशांच्या खाली किमान तापमान न जाण्याचा हा आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच अनुभवत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.............रविवार, सोमवारी पावसाची शक्यता  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. २९ व ३० डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान