लोणी-धामणीत अघोषित संचारबंदी

By Admin | Updated: May 7, 2014 21:35 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:35:03+5:30

उन्हाच्या झळाचा तीव्र त्रास होऊ लागला आहे. हवेत उष्मा जाणवत आहे.

Miniclip Undisclosed Inhibition | लोणी-धामणीत अघोषित संचारबंदी

लोणी-धामणीत अघोषित संचारबंदी

लोणी धामणी : उन्हाच्या झळाचा तीव्र त्रास होऊ लागला आहे. हवेत उष्मा जाणवत आहे. अंगाची लाही लाही होत असल्याने लोणी धामणी (ता. आंबेगाव) परिसरात दुपारच्या वेळी माणसांचा शुकशुकाट दिसत असल्याने येथील बाजारपेठात अघोषित संचारबंदी जाणवत आहे.
मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. ओढ्यांची-तलावांची पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. पाऊस जर वेळेवर झाला, तरच पाण्याची चिंता मिटणार आहे, असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. परंतु, या वेळचा उन्हाळा अत्यंत कडक असल्याने नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडायला धजावत नाहीत; मात्र दुपारच्या पुढे वळई रचणे, गुरांच्या गोठ्यांची, घरांची डागडुजी करणे आदी कामे नागरिक करीत आहेत.

Web Title: Miniclip Undisclosed Inhibition