शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ; शेतकऱ्यांना कात्रज दूध संघाकडून नवीन वर्षांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 15:46 IST

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या बैठकीत निर्णय 

पुणे : जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतक-यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी ) नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. खाजगी दूध संघाकडून खरेदी दर कमी केला जात असताना कात्रज दूध संघाने आपल्या शेतक-यांना 1 जानेवारी पासून गायीच्या दुधासाठी प्रति लीटर 1 तर म्हैशीच्या दुधासाठी प्रति लीटर 2  रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले.

खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ आहे.

सभेच्या सुरुवातीस  संघाचे चेअरमन विष्णु हिंगे यांनी संघाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली. संघाला सन  2019-2020 या आर्थिक वर्षांत 2 कोटी 48 लाख 85 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लि.1 रुपयांप्रमाणे एकूण सुमारे 6 कोटी 94 लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार असून,  पैकी प्रति लीटर 50 पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. तर उर्वरित रक्कम मार्च 2021 पूर्वी अदा केली जाणार आहे. सभेमध्ये 218 संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. कोरोना कालावधीत संघाने चांगल्याप्रकारे कामकाज केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे आभार मानले. कोरोनाकाळातही संघाची भरभराट 

कोरोना महामारीचे काळात संघाने नियोजनपूर्वक व योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज केल्याने संघाची आर्थिक घडी जास्त विस्कळीत झाली नाही. परिणामी दूध उत्पादकांचेही नुकसान झाले नाही. यावर्षी गणेशोत्सव व दीपावलीमध्ये संघाच्या मिठाई विक्रीत मोठी वाढ झाली. संघाची गणेशोत्सवामध्ये सुमारे 21 टन मोदक व पेढे व मिठाईची विक्री झाली असून दसरा सणाच्या वेळी 8 टन मिठाई 9 टन श्रीखंड/ आम्रखंड तर दीपावलीमध्ये 21 टन मिक्स मिठाईची विक्री झालेली आहे. संघाची सर्व उत्पादने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. - विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ

टॅग्स :milkदूधPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी