शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
2
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
4
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
5
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
6
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
7
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
8
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
9
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
10
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
11
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
12
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
13
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
14
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
15
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
16
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
17
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
18
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
19
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
20
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

Indian Army| लष्करी अभियांत्रिकी सेवा; करिअरचा एक चांगला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:30 IST

निनाद देशमुख पुणे : युद्ध जिंकण्यासाठी, शत्रुला हरवण्यासाठी विजेच्या वेगाने हल्ला करणे महत्त्वाचे असते; मात्र हे करणे सोपे नसते. यात ...

निनाद देशमुख

पुणे: युद्ध जिंकण्यासाठी, शत्रुला हरवण्यासाठी विजेच्या वेगाने हल्ला करणे महत्त्वाचे असते; मात्र हे करणे सोपे नसते. यात काही निसर्गाचे तर काही मानव निर्मित अडथळे असतात. वाटेत येणाऱ्या नदी, नाले पार करण्यासाठी कृत्रिम पुलांची आवश्यकता असते. तर शत्रूने पेरलेले भूसुरुंग निकामी करण्यासाठी आधुनिक यंत्राची गरज असते. यासाठी लष्करात अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारतीय लष्करासाठी अभियंते तयार करण्यासाठी पुण्यात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ज्यांना लष्करात करिअर करायचे आहे, अशा तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.

लष्कराचे विविध विभाग असतात. लष्करी अभियांत्रिकी विभाग हा त्यातील एक भाग आहे. जवानांना मदत करण्यासाठी हा विभाग चोख कार्य बजावत असतो. सीमावर्ती भागात वेगाने रस्ते तयार करणे, पूल बांधणे, कृत्रिम पुलांची उभारणी करणे, लष्करांच्या वाहनांची देखरेख ठेवणे यासोबतच नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे या अभियंत्याचे काम असते. साधारणत: मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ही लष्कराच्या इतर विभागाप्रमाणेच कठीण आणि आव्हानात्मक असते.

साधारणत: वर्षात दोन वेळा या विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही होत असते. या संदर्भातील नोटीफिकेशन ही लष्कराच्या जॉईन मिलटरी सर्व्हिसेह या वेबसाईटवर जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यात निघते. अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १२ वी परीक्षेत ७० टक्के असणे अनिवार्य आहे. यासाेबतच जेईई ही परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उपलब्ध जागांनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यानंतर निवड केलेल्या मुलांना एसएसबी मुलाखतीची तयारी करावी लागते. लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातून पास होणारे अभियंत्यांना लष्करात अधिकारी पदाचा दर्जा मिळतो. सुरुवातीला कॅप्टन आणि लष्करात सेवा केल्यानंतर अनुभव आणि सेवा कालावधीनुसार त्यांना पदोन्नतीही मिळत असते.

एसएसबी मुलाखत ही महत्त्वाची पायरी असते. यामुळे याची चांगली तयारी करणे गरजेचे असते. एसएसबी मुलाखत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. साधारणत: ३ ते ४ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना लष्करी अभियांत्रिकी सेवेत विविध विभागात सामावून घेतले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमटेक आणि एमई आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीही मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यासाठी त्यांना अभ्यासक्रम रजाही मिळत असते.

लष्करी अभियांत्रिकी सेवा ही एक मानाची सेवा आहे. या क्षेत्रात तरुणांना करिअर करण्याची एक चांगली संधी आहे. सक्षम अभियंते हे लष्कराला आणखी बळकट करीत असतात. जिद्द, चिकाटी आणि ध्यास या त्रीसूत्रीचा वापर केल्यास यात नक्कीच यश मिळते. तर चला तयारीला लागुयात.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनMaharashtraमहाराष्ट्र