पुणे : मंत्र्यांच्या वेळा आणि आचारसंहिता यामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत अखेर मंगळवारी (दि. १०) जाहीर होणार आहे. म्हाडातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४ हजार १८६ सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी १२ वाजता संगणकीय पद्धतीने काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सोडतीच्या ४ हजार १८६ सदनिकांसाठी एकूण २ लाख ५८ हजार ८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २ लाख १५ हजार ९६५ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला असून, त्यांचाच सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पुणे मंडळातर्फे सोडतीसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी ४ हजार १८६ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३ हजार ३२२ सदनिका आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेल्या संदेशातील युट्यूब लिंकद्वारे सोडतीचा थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
Web Summary : MHADA's Pune division housing lottery, delayed four months, will be announced Tuesday. Over 4,000 houses across Pune, Pimpri-Chinchwad, and nearby regions are up for grabs. Over two lakh applicants are participating. The draw will be live-streamed.
Web Summary : म्हाडा के पुणे मंडल की आवास लॉटरी, जो चार महीने से विलंबित है, मंगलवार को घोषित की जाएगी। पुणे, पिंपरी-चिंचवड और आसपास के क्षेत्रों में 4,000 से अधिक घर उपलब्ध हैं। दो लाख से अधिक आवेदक भाग ले रहे हैं। ड्रा का सीधा प्रसारण किया जाएगा।