शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Pune Metro: मेट्रोची इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा सुरू; पहिल्या टप्प्यात 'या' १० स्थानकांवर ई-बाइक सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:35 IST

ई-बाइक फीडर सेवेसाठी संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन्स (प्लग-इन आणि स्वॅपिंग) उपलब्ध करण्यात येणार

पुणे : पुणेमेट्रोच्याप्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या दैनंदिन १ लाख ६० हजारपेक्षा जास्त प्रवासीमेट्रोतून प्रवास करत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या (फस्ट व लास्ट माईल) कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर, वनाझ या १० स्थानकांवर ई-बाइक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे.

'स्विच ई-राइड' या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइकमार्फत ही सेवा दिली जाणार आहे. ही सेवा घेण्यासाठी नागरिकांना मोबाइल ॲप्स डाउनलोड करावे लागेल. केवायसी पूर्ण करून या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. सुरक्षित, अखंड, लाइव्ह ट्रॅकिंग आणि सहाय्यतेसाठी ग्राहक सेवा, जिओ-फेन्सिंग सक्षम करण्यात येणार आहे. भविष्यात पुणे मेट्रो मोबाइल ॲप्समध्ये एकत्रित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही सेवा उपलब्ध असणार आहे. ई-बाइक फीडर सेवेसाठी संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन्स (प्लग-इन आणि स्वॅपिंग) उपलब्ध करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या काळात ही योजना मेट्रो स्टेशन्स आणि जिथे सुरक्षित 'डॉकिंग स्टेशन्स' उभारण्याची जागा उपलब्ध असेल अशा शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स/आयटी पार्क्स आणि मोठ्या सोसायट्या आणि सरकारी कार्यालये यांच्या दरम्यान चालवण्याची आहे.

ई-बाइकची वैशिष्ट्ये

- गती - जास्तीत जास्त २५ किमी- क्षमता - दोन व्यक्ती- एकदा चार्ज केल्यावर जास्तीत जास्त ८० किमी.- मदतीसाठी मोबाइल ॲपवर 'एसओएस' बटण उपलब्ध आहे.- कीलेस स्टार्टिंग – मोबाइल ॲप्सवर सुरू आणि बंद करण्याची सोय.- लाइव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग.

असे आकारले जातील भाडे...

वेळ             रक्कम

-एक तास - ५५ रुपये-दोन तास - ११०-तीन तास - १६५-४ तास - २००-६ तास - ३०५-२४ तासांसाठी - ४५०

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोbikeबाईकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpassengerप्रवासी