शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्राे मार्गात सापडलेल्या भुयाराची तयार करणार प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:35 IST

शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे  : स्वारगेट या ठिकाणी मेट्राेतर्फे मल्टिमाॅडेल ट्रान्सपाेर्ट हब तयार करताना महामेट्राेला ब्रिटीशकालीन भुयार सापडले हाेते. हे भुयार पुणेकरांच्या कुतुहलाचा विषय झाले हाेते. हे भुयार सापडल्यामुळे काहीकाळ मेट्राेचे काम थांबविण्यात आले हाेते. या भुयाराची पाहणी पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आली असून हे भुयार ब्रिटीशकालीन असल्याचे समाेर आले आहे. 1908 ते 1915 या काळात हे भुयार बांधले गेले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे. 

28 मार्च राेजी स्वारगेट येथे महामेट्राेला ब्रिटीशकालीन भुयार सापडले असल्याची बातमी सर्वप्रथम लाेकमतने प्रकाशित केली हाेती. त्यानंतर सर्वच माध्यमांनी याची दखल घेतली हाेती. हे भुयार पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाले हाेते. हे भुयार सापडल्यामुळे काही काळ मेट्राेचे काम थांबविण्यात आले हाेते. पुरातत्त्व खात्याने या भुयाराचा अभ्यास केला असून त्याचा अहवाल तयार केला आहे. स्वारगेट येथे सापडलेले भुयार हे ब्रिटीशकाळात पाणी पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत हाेते. साधारण 1908 ते 1915 या काळात हे वापरण्यात येत असावे. या भुयाराची पाहणी करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. भुयाराचा अभ्यास करताना शहराचा इतिहास, काढलेले काही निष्कर्ष, जुन्या नाेंदी यांचा विचार करण्यात आला. पेशवे काळात कात्रज तलावातून शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणण्यात आले हाेते. याचा विचार करता हे भुयार फारसे जुने नाही. त्यामुळे मेट्राेचे काम त्याच ठिकाणी असल्याने हे भुयार भुजवण्यास हरकत नसल्याचे पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख विलास वहाणे यांनी सांगितले. 

दरम्यान असे असले तरी या भुयारातील दगड आणि इतर गाेष्टी वापरुन या भुयाराची प्रतिकृती तयार करण्यास मेट्राेला सांगण्यात आले आहे. जेथे भुयार सापडले त्यापासून काही अंतरावरच ही प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. ज्याद्वारे पुणेकरांना या भुयाराची माहिती घेता येणार आहे. लवकरत प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही वाहणे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोcultureसांस्कृतिकhistoryइतिहास