शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST2021-02-13T04:11:18+5:302021-02-13T04:11:18+5:30
नुकताच सीए झालेला शाळेचा माजी विद्यार्थी शुभम बेंडभर याचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती मध्ये उत्तीर्ण झालेले ...

शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नुकताच सीए झालेला शाळेचा माजी विद्यार्थी शुभम बेंडभर याचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती मध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी हर्षदा पाटील, अथर्व डफळ, साहिल शिंदे, अथर्व भास्करे, श्रेयल मांढरे, श्वेता बुवा, आर्यन आहिरे, प्रीती वाळूंज, जुनेद तांबोळी, महम्मद रय्यान शेख, अदनान मोहम्मद शेख, प्रियांका आगरकर, समृद्धी यादव, प्रणव फड, स्वरांजली फापाळे, तन्वीर मोमीन, गायत्री एवळे या विद्यार्थ्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर यावेळी शिरूर येथील कै. कलाबाई प्रेमराज दुगड यांच्या यांच्या स्मरणार्थ उद्योजक सुमतीलाल दुगड यांच्या वतीने व शिक्रापूर येथील गायत्री क्लॉथ सेंटर यांच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले . रोटरी क्लबच्या माध्यमातून शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनील बोरा यांच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.