शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुण्यातील व्यापारी आक्रमक; २ दिवसांत निर्बंध कमी न केल्यास बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 5:31 PM

वेळेच्या बंधनाविरोधात व्यापाऱ्यांचे ३ ऑगस्टला घंटानाद आंदोलन

ठळक मुद्देअटक करून कारवाई झाली तरी व्यापारी त्यास सामोरे जाण्यास तयार

पुणे : शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२. १५ या वेळेत घंटानाद आंदोलन करणार आहेत. 

दरम्यान यानंतरही राज्य सरकार जागे झाले नाही व दुकानांच्या वेळा वाढविलया नाहीत, तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया व आदी पदाधिकारी उपस्थित होते.  रांका म्हणाले, दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू आहेत, राजकीय सभा समारंभ, आमदारांच्या मुलांचे शाही विवाह होतात. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत. यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणीही त्यांनी केली़  

महापालिकेने व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह विकेंड लॉकडाऊनमधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त जैसे थे राहतील, असा आदेश काल काढला आहे. महापालिकेचा हा प्रकार म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचे यावेळी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले. 

टास्क फोर्सची ही मस्तीच 

दुकाने उघडी ठेवल्याने कोरोना पसरतो हा जावई शोध कुठल्या आधारावर टास्क फोर्सने लावला. हे अद्याप समजलेले नाही़ या टास्क फोर्सकडून मुंबईमध्ये एसी कार्यालयात बसून, पुणे शहराबाबत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. टास्क फोर्सची ही केवळ मस्तीच असून, तिसऱ्या लाटेबाबत जनतेला व व्यापाऱ्यांना घाबरवण्याचे काम केले जात असल्याची टीका फत्तेचंद रांका यांनी यावेळी केली. दरम्यान व्यापारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुुंबियांना लसीकरणासंदर्भात सरकारने कुठलाच निर्णय वारंवार पाठपुरावा करूनही घेतला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात महासंघाने सर्व सुविधा स्वखर्चाने उभारून देखील मुबलक लस पुरवठा होत नसल्याने या वर्गातील लसीकरण खोळबले असल्याचे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbusinessव्यवसायAjit Pawarअजित पवार