शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

स्टींग ऑपरेशन; पुण्यात कॉलेज ॲडमिशनसाठी लुटणारे ‘मेनू कार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 07:54 IST

‘व्हीआयटी’त ॲडमिशन करून देताे, सांगून लाखाेंची मागणी : हातावर टेकवली ‘व्हीयू’ची पावती

लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : सीईटी, नीट परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. अनेक मुलांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत; तरीही नामांकित संस्थेत प्रवेश हवा, असा अट्टहास मुले धरत आहेत. काही ठग प्रवेशाचे जणू मेनू कार्डच घेऊन पालकांना गाठत असल्याचे विदारक चित्र अनुभवास येत आहे.

असा हाेताे व्यवहारपुण्याबाहेरील पालक : मुलाला मॅनेजमेंट काेट्यातून अभियांत्रिकीला ॲडमिशन हवे आहे. किती डाेनेशन लागेल? एजंट : डाेनेशन खूप लागेल. आम्ही कमीत कमी पैशांत करून देताे.पालक : किती द्यावे लागेल? आणि काेणत्या संस्थेत प्रवेश मिळेल? एजंट (संस्थेत सब-रजिस्ट्रार असल्याचे सांगत) : या नामांकित काॅलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी तीन लाख रुपये लागतील. पावती मिळणार नाही. ट्यूशन फी वेगळी भरावी लागेल. पालक : ठीक आहे. प्रवेश हवाय कधी येऊ?एजंट : आजच या. प्रवेश उद्या दुपारपर्यंत क्लाेज हाेतील. तुम्हाला शक्य नसल्यास ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे देऊन पाठवा. आम्ही प्रवेश ओक्के करू. तुम्हाला ऑनलाइन रिसीट मिळून जाईल.नातेवाईक : पैसे घेऊन एक व्यक्ती येत आहे. ताेपर्यंत क्लासरूम, हाॅस्टेल, आदी दाखवा.एजंट : मुलगा आला की त्यालाच दाखवू सर्व. तुम्ही लवकर पैसे मागवून घ्या. नाही तर मी चेकची फाेटाे काॅपी टाकताे.  त्या खात्यात तत्काळ तीन लाख टाकायला सांगा. (व्हाॅट्सॲपवर चेकचा फाेटाे पाठवला.)

गडबड वाटल्याने नातेवाइकाने मित्राला बाेलावून घेतले. पालकाला सतर्क केले. संस्थेत जाऊन पावतीची सत्यता तपासली. महाविद्यालय व्यवस्थापन : तब्बल २६ हजार रुपये भरून प्रवेश घेतल्याची पावती बराेबर आहे. परंतु, येथे प्रवेश घेण्यासाठी ट्यूशन फीव्यतिरिक्त काेणतेही डाेनेशन घेतले जात नाही. थेट या आणि प्रवेश घ्या. काेणत्याही मध्यस्थांना पैसे देऊ नका.  

नातेवाईक : संबंधित एजंट तुमच्या संस्थेची पावती घेताे आणि पालकांना ती पाठवून विश्वास संपादन करताे, हे कसे शक्य आहे?संस्था : प्रवेशासाठी अनेकदा पालक किंवा नातेवाईक येतात. ते शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतात. त्यानुसार ही व्यक्ती गेली असावी. दुसरा एजंट : नातेवाइकाला फाेन करून मुलाच्या पालकांना तत्काळ तीन लाख रुपये खात्यात टाकायला सांगा. 

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयPoliceपोलिस