शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'मानसिक' थकवा ; किमान दोन दिवसांच्या सुट्टीची अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:04 IST

शहरातील रुग्ण संख्या वाढत असताना सुट्या देणे शक्य होणार नाही.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून सुटी व रजा न घेता काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीची आवश्यकता

पुणे : कोरोनाचा शहरात शिरकाव झाल्यापासून 'ऑनफिल्ड' काम करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यात एकही सुट्टी मिळालेली नाही. त्यामुळे मानसिक थकवा येऊ लागला असून आठवड्यात किमान एखादी तरी सुटी द्या अशी मागणी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने ही सुट्टी मिळणे तूर्तास तरी अवघड असल्याचे अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात ९ मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनासंदर्भात ड्युटी लावण्यात आल्या. गेल्या दोन महिन्यात एकही सुटी ना घेता पालिकेचा आरोग्य विभागासह सर्वच विभाग अहोरात्र काम करीत आहेत. या काळात सर्व सुट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुटी व रजा न घेता काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आता सुट्टीची आवश्यकता भासू लागली आहे. शारीरीकच नव्हे तर मानसिक थकवा येऊ लागल्याने कामावर परिणाम होण्याची शक्यताही हे अधिकारी वर्तवित आहेत. पोलिसांपाठोपाठ पालिकेचाही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. पालिकेचे डोकटर्स, नर्स, आया, वॉर्ड बॉय हे तर जिवाची जोखीम पत्करून काम करीत आहेत. यासोबतच रविवार सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. अनेकदा वेळी अवेळी बैठकांचेही आयोजन केले जाते. या सर्व काळात सतत काम आणि मानसिक ताण येत असल्याने आम्हाला एखाद्या दिवसाची सुटी द्यावी अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुंबईमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असा प्रयोग केला जात आहे. त्यानुसार पुण्यातही सुट्टी द्यावी असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ---------- ज्यांना सुटी देणे शक्य आहे त्यांना सुट्टी दिली जात आहे. परंतु, शहरातील रुग्ण संख्या वाढत असताना सुट्या देणे शक्य होणार नाही. मानसिक ताणतणाव कमी करण्याकरिता आम्ही शिबिर सुद्धा घेतले आहे. सध्या एकप्रकारे युद्धाचा प्रसंग असून त्याकरिता हरतहेर्नें प्रयत्न आणि काम करणे आवश्यक आहे. - शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम