शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष दिन विशेष : शेवटी कला ही कला; ती स्त्री-पुरूष असा भेद मानत नाही..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:00 IST

‘अभिव्यक्त होणारी जरी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच..

ठळक मुद्देनृत्य आणि रंगावली या कलाप्रकारांमध्येही पुरुषांनी वेगळेपण अधोरेखित

पुणे : ज्याप्रमाणे पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांनी वर्चस्व सिद्ध केले, त्याचप्रमाणेच ज्या क्षेत्रांमध्ये महिला अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात अशा नृत्य आणि रंगावली या कलाप्रकारांमध्येही पुरुषांनी वेगळेपण अधोरेखित केले आहे. ‘अभिव्यक्त होणारी जरी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच आहे. शेवटी कला ही कला आहे, ती स्त्री-पुरूष असा भेद पाळत नाही,’  अशा शब्दांत महिलाप्रधान कलांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्येष्ठ कथ्थक नर्तक पं. नंदकिशोर कपोते म्हणाले, ‘‘शास्त्रीय नृत्य स्त्रीप्रधान असले तरी त्याचे जनक पुरुषच आहेत. पूर्वी जेव्हा मी सुरुवातीला नृत्य करायचो , तेव्हा  मला मित्र हसत होते. ‘मुलीसारखं काय नृत्य करतो’ म्हणायचे, खूप चिडवत होते; पण घरच्यांनी माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं. पुढे पंडित बिरजूमहाराजांचं मार्गदर्शनही मला लाभलं.  कालांतरानं अनेक पुरस्कारही मिळाले. नृत्यामुळे पुरुषी रुबाब कमी होत नाही व त्यातील अदा, लकबी या केवळ नृत्य सादरीकरण करतानाच असतात. एरवीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत नसतो, हे पालकांनी ध्यानात घ्यावं.’’भरतनाट्यम् नर्तक परिमल फडके यांनीही शास्त्रीय नृत्य हे माध्यम स्त्रियांच असलं तरी ते पुढे नेण्याचा मक्ता पुरुषांचा असल्याचे आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘‘अभिव्यक्त होणारी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच आहे. लहानपणी माझ्यातील प्रतिभा ओळखून मला आईनं नृत्य वर्गात पाठवलं. अलीकडे रियालिटी शोमुळे नृत्य क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त झालं असून, शास्त्रीय नृत्यशैली अलीकडे जास्त प्रगल्भ होत चालली आहे. जी मुलं शास्त्रीय नृत्यात येतात, त्यांना आम्ही पुरुषप्रधान रचनेचं नृत्य शिकवतो. बाह्य प्रकटीकरणाकडे जास्त लक्ष न देता मुलगा म्हणून त्याला नृत्य आवडत असेल,  तर पालकांनी मुलाची आवड जोपासावी. तसेच काही पुरुष नृत्य न करताही त्यांच्या चाली बायकांसारख्या असतात; त्यामुळे नृत्य करून कुणाचीही चाल बदलत नसते किंवा पुरुषत्वाचा रुबाब कोणत्याही प्रकारे कमी होत नसतो, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.’’‘रांगोळी’ कलाकार संगमेश्वर बिराजदार यांनी  ‘रंगावली’च्या हटके कलाप्रकारात  वेगळा ठसा उमटविला आहे. ते म्हणाले, ‘‘सहसा रांगोळी मुली किंवा महिलाच काढतात. मी लहानपणी आईला व बहिणीला रांगोळी काढताना बघून त्या रांगोळीतून चित्र कसं काढायचं, हे शिकलो. त्यात विविध प्रकारचे आकार असतात. भौमितिक आलंकारिक आकार रांगोळीच्या माध्यमातून कसं काढतात ते मी बघायचो आणि माझ्यामध्ये कलेविषयी आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे  रांगोळी मी मुलगा आहे म्हणून ती काढू नये किंवा त्या गोष्टीची कधी मला लाज वाटली नाही आणि  घरच्यांनीही कधीही विरोध नाही केला, उलट कलेला प्रोत्साहनच दिलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रांगोळी स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत.’’ 

टॅग्स :PuneपुणेartकलाWomenमहिला