शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘अजितदादां’ना काैल; श्री जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:41 IST

पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच बालेकिल्ल्यात ही सहकाराच्या वर्चस्वाची पहिलीच निवडणुक होती, त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष होते

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. सोमवारी बारामतीच्या प्रशासन भवन येथे सॊमवारी (दि १८)सकाळी ९ वाजता सुरु झालेली मतमोजणी मंगळवारी (दि २० ) पहाटे ४. ३० च्या सुमारास पूर्ण झाली. जवळपास २० तास मतमोजणी सुरु होती.  

कोरोनासह कारखान्याच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावर दिर्घ न्यायालयीन लढ्यानंतर जवळपास दहा वर्षांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली. यामध्ये सुरवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोट्यावधींचे कर्ज असणाऱ्या ‘छत्रपती’ला पुर्ववैभव प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष राजकीय विरोधक असणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी करत रणनीती आखली. यामध्ये निवडणुक समन्वयक किरण गुजर यांनी महत्वाची भुमिका बाजवली. निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच बालेकिल्ल्यात ही सहकाराच्या वर्चस्वाची पहिलीच निवडणुक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष होते. 'श्री जय भवानी माता' पॅनलचे उमेदवार सुरुवातीपासून असलेली  आघाडी दुसऱ्या फेरीत देखील कायम राहिली. 

साखर संघाचे माजी अध्यक्ष व पॅनेल प्रमुख पृथ्वीराज जाचक ६८४४ विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. तर श्री जय भवानीमाता पॅनेलचे सर्व उमेदवार सुमारे पाच ते सहा हजार मताधिक्यांनी विजयी झाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच शेतकरी मेळाव्यामध्ये पृथ्वीराज जाचक यांच्या नावाची अध्क्षपदासाठी घोषणा केली होती. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जाचक यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे कारखाना चालविणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले होते.त्यामुळे आगामी पाच वर्ष जाचक हेच कारखान्या चे अध्यक्ष असतील. 

श्री जय भवानीमाता पॅनेलेचे उमेदवार व मिळालेली अंतिम मते... 

गट नंबर - १ पृथ्वीराज  साहेबराव जाचक ( ११६९४), अॅड.शरद शिवाजी जामदार (१०५२९), गट नंबर-२   रामचंद्र विनायक निंबाळकर (१०९२९) , शिवाजी रामराव  निंबाळकर  (१०४३१)गट नंबर -३ पृथ्वीराज श्रीनिवास घोलप (९६७२)  , गणपत सोपाना कदम ( ९२९७)  .गट क्रमांक- ४ प्रशांत दासा दराडे  (१११८०), अजित  हरिश्‍चंद्र नरुटे(११०९०)  , विठ्ठल पांडुरंग शिंगाडे ( १०२३५)गट  क्रमांक - ५ अनिल सिताराम काटेे ( ११७८९),  बाळासाहेब बापुराव कोळेकर (११७६८ ) , संतोष शिवाजी मासाळ  (१०३०५)  गट क्रमांक - ६   कैलास रामचंद्र गावडे  (११८३२), निलेेश दत्तात्रेय टिळेकर (११५६३) सतीश  बापुराव देवकाते  (११२६१)

इतर मागास प्रवर्ग 

तानाजी ज्ञानदेव शिंदे ( ११३५८)

अनुसूचित जाती जमाती 

मंथन  बबनराव कांबळे ( ११५११)

महिला राखीव 

सुचिता सचिन सपकळ (१०३८४) माधुरी सागर राजापुरे (१०७७४)

भटक्या विमुक्त जाती 

डॉ.योगेश बाबासाहेब पाटील (११८४३)

ब वर्ग - अशोक संभाजी पाटील ( २८०)

श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार

 गट नंबर - १ संजय साेमनाथ निंबाळकर ( ४८५०)  , प्रताप मोहन पवार  (४१९७)गट नंबर - २  संग्रामसिंह  दत्तात्रेय निंबाळकर ( ५१६५) , महादेव  बाळू  सिरसट  (३९५७) गट नंबर - ३  करणसिंह अविनाश घोलप (६९६१) , तानाजी साहेबराव थोरात (४७२१)  गट नंबर - ४ बाबासाहेब भगवान झगडे  (४९४०), राजेंद्रकुमार बलभिम पाटील (४८६०)गट क्रमांक - ५ रवींद्र भिमराव टकले   (५४८२) गट क्रमांक - ६ नितीन अशोक काटे  (५४३४) )

इतर मागास प्रवर्ग  संदीप वसंतराव बनकर ( ५१६७)अनुसूचित जाती जमाती 

बाबासाहेब  कांबळे  ( ४९६१)महिला राखीव सिता रामचंद्र जामदार (४२८५)पद्मजा विराज भोसले (४५४५)

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024