शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री घेणार बैठक

By admin | Updated: June 21, 2014 23:16 IST

शहरातील विकासकामे मार्गी लागत नसल्याने पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उद्या (रविवारी) घेणार आहेत.

पुणो : महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे मार्गी लागत नसल्याने पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उद्या (रविवारी) घेणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी पवार यांनी महापौर बंगल्यावर बैठक  बोलावली असून, या बैठकीत ते नगरसेवकांची झाडाझडती घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, नगरसेवकांची कामे मार्गी लागावीत यासाठी या बैठकीस  महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
अवघ्या दोन वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला शहरात चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने महापालिकेत काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरात आघाडीच्या उमेदवाराचा मोठय़ा मताधिक्क्याने पराभव झालेला आहे. त्याची धास्ती पक्षाने घेतली असून, विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू नये या उद्देशाने शहरातील जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावून निवडणुकीत पुणोकरांसमोर जाण्याचा पक्षाचा मानस आहे. मात्र, पालिकेत सत्ता असूनही गेल्या काही वर्षात शहराच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे पुणोकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून, ही कामे मार्गी लावण्यासाठी पवारांनी तातडीची बैठक बोलाविली आहे. यात नगरसेवकांच्या कामाचा आढावा स्वत: पवार घेणार आहेत, तसेच नगरसेवकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. 
 
कामे होत 
नसल्याच्या तक्रारी
4महापालिका प्रशासनामुळे पक्षाच्या नगरसेवकांची कामे 
होत नसल्याच्या तक्रारीही अनेक नगरसेवकांनी केल्या असून, त्याबाबत चर्चाही या बैठकीत करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या काही पदाधिका:यांकडून सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या बैठकीसाठी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे या पदाधिका:यांनी स्पष्ट केले.