शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 20:53 IST

हर्षवर्धन पाटलांचा महिन्याभरात दोनदा दिल्ली दौरा; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

कळस: माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. पाटील यांचा महिन्यातच दोन वेळा दिल्ली दौरा झाल्याने मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यामुळे इंदापुर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे

हर्षवर्धन पाटील यांनी दिल्ली दरबारी वजन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे .त्यातून पाटील यांच्या दिल्ली वाºया वाढल्याचे संकेत आहेत. केंद्रिय मंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खाते निर्माण करून देण्यात आले आहे. या खात्याचे अभ्यासक व सहकार खात्याचे मंत्री म्हणून राज्यात पाटील यांनी दिर्घ काळ जबाबदारी संभाळली आहे. या पार्श्वभुमीवर पाटील यांनी केंद्रीय मंत्री शाह यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. याशिवाय पाटील यांनी  सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करुन पश्चिम महाराष्ट्रात  भाजप आपली  ताकद मजबूत करण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या समवेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते. सहकार चळवळीशी या दोन्ही पाटील कुटुंबाचा जवळचा संबंध आहे सुमारे २० वर्षे मंत्री राहिलेल्या पाटील यांचा सलग दोन वेळा पराभव झाला.काँग्रेस पक्षाच्या विचारधारा बाळगून पाटील यांनी २५ वर्षे तालुक्याचे व राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केला .मात्र ,आघाडीच्या राजकारणात रास्ट्रवादी काँग्रेसशी न जमल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .मात्र नव्याने भाजपवाशी झालेल्या पाटलांना भाजपकडून फारशी ताकद मिळाली नाही .त्यामुळे पाटील स्वगृही परतणार अशीही चर्चा होऊ लागली .मात्र गेली महिनाभरात पाटील यांनी दोन वेळा दिल्ली दौरा करुन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.तसेच भाजपाचे वजनदार नेते अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कायद्याची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित पाटील यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी उत्तम  आहे .त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला होता.पाटील यांना सहकार खात्याचा अनुभव असल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींनी मोठे आश्वासन दिले असल्याची तालुक्यात चर्चा आहे ..

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलAmit Shahअमित शहाPoliticsराजकारणBJPभाजपा