बारामतीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST2021-08-28T04:15:03+5:302021-08-28T04:15:03+5:30
या वेळी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांच्या संकल्पनेतून व आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार ...

बारामतीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार
या वेळी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांच्या संकल्पनेतून व आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला.
कोरोना काळात मधुमेह आणि हृदयरोगाने त्रस्त असून देखील २४ तास सेवा देणाऱ्या ६१ वर्षीय डॉ. कल्याण देशपांडे यांच्यासह रुग्णांना औषध वाटप करणारे गणेश गावडे, परिचारक भास्कर ठोंबरे, कंत्राटी रुग्णवाहिका चालक महेश रूपनवर, अर्धवेळ परिचर असून पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या आशा खरात यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अंबादास गायकवाड, हणुमंत निंबाळकर, गणेश कोकरे, अमोल गलांडे, म्हस्कू शेंडगे, रोहन पांढरे, पांडुरंग सूळ, शेकलाल घोरपडे आदी उपस्थित होते.
डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना गजानन वाकसे आणि अन्य.
२७०८२०२१ बारामती—०४