शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Remdisivir Fraud! रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजारांना विकणार्‍या मेडिकल दुकानदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:27 IST

काळा बाजार केल्याप्रकरणी एकाला अटक तर एकावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देशिल्लक राहिलेले इंजेक्शन दुकानदाराला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी दिले

पुणे: वडिलांसाठी घेतलेल्या ४ पैकी एक रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक राहिल्याने ते परत आणून दिले. हे इंजेक्शन काळ्या बाजारात ४५ हजार रुपयांना विकणार्‍या मेडिकल दुकानदाराला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. लोहगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भरत पवार (रा़ लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

ओमकार पवार यांचे वडिल कोरोनामुळे आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पवार यांनी ४ रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्येकी १३०० रुपये प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकत घेतली होती. त्यापैकी १ इंजेक्शन शिल्लक राहिले होते. त्यांनी ते देवेंद्र चौधरी याला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी दिले. चौधरी याचे लोहगाव येथे शिव मेडिकल या नावाने दुकान आहे. चौधरी याने हे इंजेक्शन एकाला ४५ हजार रुपयांना बेकायदेशीररित्या विकले. त्याची कोणतीही पावती करण्यात आली नाही. याबाबतची तक्रार मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने देवेंद्र चौधरी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या