शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

पुणे जिल्ह्यात डॉक्टरांच्या बंदचा वैद्यकीय सेवेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:18 PM

कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यात सर्वत्र वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती...

ठळक मुद्देबारामती शहरात वैद्यकीय सेवा बंद : दौैंड, ओतूर, जुन्नरमध्ये सेवा कोलमडली

बारामती : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १७) बारामती शहरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती. डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला आहे. संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये बारामती येथील आयएमएच्या सदस्यांनी सहभाग घेतला. आज (सोमवारी, दि. १७) सकाळी ६ वाजल्यापासून उद्या मंगळवार (दि. १८) सकाळी ६ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.  बारामती येथे सर्व डॉक्टरांनी एकत्र येत कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केला. यावेळी बारामती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, सचिव डॉ. सोमनाथ राऊत, माजी स्टेट प्रेसिडेंट डॉ. अशोक तांबे, खजिनदार डॉ. संतोष घालमे, माजी अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. विभावरी साळुंके  आदी डॉक्टर उपस्थित होते...........ओतूर :  कोलकाता येथे डॉक्टरावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील सर्व डॉक्टरांनी देशव्यापी बंद पुकारला होता. त्याला पाठिंबा म्हणून जुन्नर तालुका मेडिकल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनने तालुक्यातील सर्व दवाखाने बंद ठेवून बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला, अशी माहिती जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष डॉ. शशांक फापाळे यांनी दिली. तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने चोवीस तास बंद ठेवले होते. १८ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवणार आहेत. यात तातडीची सेवा वगळून बंद पाळण्यात आला. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व डॉक्टरांना धन्यवाद दिले.  या विषयी अधिक माहिती देताना जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनचे संस्थापक डॉ. भरत घोलप म्हणाले, हल्ली डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. या विषयी जो कायदा आहे त्याची  कडक अंमलबजावणी व्हावी  या मागणीसाठी हा देशव्यापी बंद पाळण्यात आला. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. संजय वेताळ, डॉ. सदानंद राऊत, डॉ. रश्मी घोलप, डॉ. प्रवीण डुंबरे, डॉ. सुशील बागूल, डॉ. योगश पाटील उपस्थित होते.

दौंडला डॉक्टरांच्या ‘बंद’ला प्रतिसाददौैंड : दौैंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशव्यापी डॉक्टरांच्या संपाला उत्स्फूर्तपणे प्र्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दौैंड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा सुरेखा भोसले यांनी दिली.  भविष्यात डॉक्टरांच्या होणाºया मारहाणीबद्दल संबंधित व्यक्तींना कडक शासन व्हावे, तसेच डॉक्टरांना मारहाण होणार नाही यासंदर्भात शासनाने योग्य ती दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.  सदरचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी दौंड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.जुन्नर परिसरात बंदला डॉक्टरांचा १०० टक्के प्रतिसाद

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल