शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Pune Police: मृणाल शेवाळेसह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का, पुणे पोलिसांची कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: October 2, 2023 14:14 IST

सनीने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळी बनवून स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत...

पुणे : उरळी देवाची गावात तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे आणि त्याच्या २ साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.

२६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी उरळी देवाची या गावातील स्माशानभूमीजवळ असलेल्या ओढ्याजवळ पाईपलाईन दुरूस्तीचे काम करत होते. त्यावेळी सनी उर्फ मृणाल शे‌वाळे याने त्यांना तलवारीचा धाक दाखवत काम सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्याचे साथीदार प्रसाद भाडळे आणि समीर जमादार यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. यावेळी शेवाळेने ५० हजार दिले नाही तर मारून टाकण्याची धमकी देत हातातील तलवार हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत, कुणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत दहशत निर्माण केली. याप्रकरानंतर शेवाळे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे (२६, रा. उरळी देवाची), प्रसाद बापुसाहेब भाडळे (२३, रा. उरळी देवाची) आणि समीर बाबुलाल जमादार (२३, रा. मंतरवाडी) यांना अटक केली होती. सनीने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळी बनवून स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत.

मागील १० वर्षांमध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशिररीत्या हत्यार बाळगून दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी