एमबीए विद्याथ्र्याच्या आरक्षणाचा घोळ
By Admin | Updated: June 8, 2014 00:51 IST2014-06-08T00:51:14+5:302014-06-08T00:51:14+5:30
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आलेल्या अर्जावर अनेक मागासवर्गीय विद्याथ्र्याचे नाव खुल्या प्रवर्गात गेले आहे.

एमबीए विद्याथ्र्याच्या आरक्षणाचा घोळ
>पुणो : एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आलेल्या अर्जावर अनेक मागासवर्गीय विद्याथ्र्याचे नाव खुल्या प्रवर्गात गेले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तंत्र शिक्षण संचालनालय (डीटीई) व अर्ज स्वीकृती केंद्र परस्परांकडे बोट दाखवत असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. दरम्यान, आज (रविवारी) ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर सायंकाळी 5 वाजता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.
‘डीटीई’तर्फे राज्यात विविध अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्याथ्र्याकडून 31 मेपूर्वी नोंदणी अर्ज भरून घेतले. त्यानुसार 2 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी ज्या मागासवर्गीय विद्याथ्र्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नव्हते, त्यांना नोंदणी अर्जात खुल्या प्रवर्गातून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यान या विद्याथ्र्याना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यानुसार 3 ते 5 जून या हरकती नोंदविण्याच्या कालावधीत विद्याथ्र्याना प्रवर्ग बदलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कालावधीत काही विद्यार्थी संबंधित केंद्रांवर गेले असता, त्यांची खुल्या प्रवर्गातील नोंदणी बदलत नसल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी ‘डीटीई’ च्या विभागीय कार्यालयात गेल्यानंतर तिथे मुंबईला जाण्याचा सल्ला मिळाला. योग्य माहिती न मिळाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
खुल्या प्रवर्गातून नोंद झाल्याने आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. जागा शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल. मात्र, तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्याने ‘एमबीए’ला प्रवेश घेऊ शकणार नाही, असे काही विद्याथ्र्यानी सांगितले. संबंधित केंद्राकडून चूक झाली आहे. त्याचा भरुदड आम्हाला बसेल. याबाबत संचालनालयाने योग्य निर्णय घेणो अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
4विद्याथ्र्याची नोंद खुल्या प्रवर्गात झाल्याच्या तक्रारी मिळाल्या नाहीत. संबंधित अर्ज स्वीकृती केंद्राची ही संपूर्ण जबाबदारी असते. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यास ‘डीटीई’कडून त्याचे निरसन केले जाते. मात्र, पुण्यातून अशा काही तक्रारी आलेल्या नाहीत, असे डीटीईचे विभागीय सहसंचालक पी. व्ही. सरोदे यांनी सांगितले.
4‘डीटीई’तर्फे राज्यात विविध अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्याथ्र्याकडून 31 मेपूर्वी नोंदणी अर्ज भरून घेतले. त्यानुसार 2 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी ज्या मागासवर्गीय विद्याथ्र्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नव्हते, त्यांना नोंदणी अर्जात खुल्या प्रवर्गातून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यान या विद्याथ्र्याना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. खुल्या प्रवर्गातून नोंद झाल्याने आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. जागाशुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल.