पाणीकपात टाळण्यासाठी महापौरांचा बचतीचा नारा
By Admin | Updated: November 29, 2014 00:09 IST2014-11-29T00:09:46+5:302014-11-29T00:09:46+5:30
सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणीकपात टाळण्यासाठी महापौरांचा बचतीचा नारा
पुणो : सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणोकरांना उन्हाळ्यात पाणी कपातीला समोरे जावे लागू नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच पाण्याची नासाडी टाळून पाणीबचत करावी, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज केले.
यंदा मॉन्सूनच्या पावसानेच जुलै महिन्यांर्पयत ओढ दिली होती. त्यामुळे पुणोकरांना एकदिवसा आड पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस पडल्याने धरणो 1क्क् टक्के भरली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणक्षेत्रत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला नुकतेच पाणीकपातीचे पत्र दिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर महापौर धनकवडे यांनी नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे.
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी पाणीकपात टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणीबचत करावी. खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून अनावश्यक पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक जनजागृती मोहीम राबवावी, असे पत्र महापौर धनकवडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. (प्रतिनिधी)
खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल, असे महापौर म्हणतात.