महापौर टिळक मेक्सिको दौऱ्यावर

By Admin | Updated: April 26, 2017 04:16 IST2017-04-26T04:16:50+5:302017-04-26T04:16:50+5:30

महापौर मुक्ता टिळक १ मे रोजी मेक्सिको दौऱ्यावर जाणार आहेत. फोरम फॉर वुमेन्स फेडरेशन या संस्थेने आयोजित केलेल्या

Mayor Tilak tourists to Mexico | महापौर टिळक मेक्सिको दौऱ्यावर

महापौर टिळक मेक्सिको दौऱ्यावर

पुणे : महापौर मुक्ता टिळक १ मे रोजी मेक्सिको दौऱ्यावर जाणार आहेत. फोरम फॉर वुमेन्स फेडरेशन या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिलाविषयक चर्चासत्रात त्या सहभागी होतील. केंद्र सरकारने त्यांची या दौऱ्यासाठी निवड केली आहे. २ व ३ मे असे दोन दिवस हे चर्चासत्र होईल. ‘भारतीय महिलांचे राजकारणातील स्थान व सक्षमीकरण’ या विषयावर महापौर तिथे बोलणार आहेत. संपूर्ण भारताचे त्या प्रतिनिधित्व करतील. केंद्र सरकारच्या शहरविकास मंत्रालयाने त्यांची तसेच कोची येथील महापौरांची या दौऱ्यासाठी निवड केली होती.
जगभरातील अनेक देशांमधील विविध क्षेत्रांमधील महिला या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

Web Title: Mayor Tilak tourists to Mexico