शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 18:34 IST

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.

मावळ ( पिंपरी चिंचवड) -  पुणे जिल्ह्यातील मावळ येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. यात बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस,पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे  एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.  त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.   

 यावेळी रोहित पवार म्हणाले, आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत कशी मिळेल असा आहे. जे लोक अडकलेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदीपात्रात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोहित पवार यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना! मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. दरम्यान, कुंड मळा येथे नैसर्गिक रांजणखळगे आहे. नदीच्या प्रवाहामध्ये रांजणखळले असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणे अवघड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळ परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी मावळचे आमदार सुनील शेळके पोचले आहे. घटनास्थळी क्रेन पाचारण केले आहे. पाण्यात कोसळलेला पुलाचा लोखंडी भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.'सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यताज्यावेळेस पुल कोसळला त्यावेळी पुन्हा वर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते. तसेच पुलाखालील भागामध्ये ही काहीजण नदीकाठी बसले होते. अचानक फुल कोसळल्याने त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत.  त्यांचा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तविली आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातmavalमावळ