Pune: चिंचवडमध्ये सर्वाधिक १९ हजार मतदार, कसब्यात सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:33 PM2023-11-04T12:33:46+5:302023-11-04T12:34:19+5:30

कसबा पेठेत सर्वांत कमी मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे...

Maximum 19 thousand voters in Chinchwad, lowest in Kasab vidhansabha | Pune: चिंचवडमध्ये सर्वाधिक १९ हजार मतदार, कसब्यात सर्वात कमी

Pune: चिंचवडमध्ये सर्वाधिक १९ हजार मतदार, कसब्यात सर्वात कमी

पुणे : जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून ५ जानेवारीच्या अंतिम मतदार यादीच्या तुलनेत जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक १९ हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. हडपसर मतदारसंघात १४ हजार ७५९ मतदार वाढले असून हे शहरातील ८ मतदारसंघांत सर्वाधिक आहेत. त्या खालोखाल वडगावशेरीत ११ हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. तर कसबा पेठेत सर्वांत कमी मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच अद्ययावत मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण मतदारसंख्या ही ८० लाख ७३ हजार १८३ झाली असून ५ जानेवारीच्या अंतिम मतदार यादीच्या तुलनेत त्यात एक लाख २१ हजार ७६३ ने वाढ झाली आहे. तर ५ जानेवारीला हीच संख्या ७९ लाख ५१ हजार ४२४ इतकी होती.

जिल्ह्यातील २१ मतदारसंघापैकी प्रत्येक मतदारसंघात मतदारांची वाढ झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ११ मतदारसंघापैकी चिंचवड, हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघात भौगोलिक क्षेत्रात वाढ झाली. या तीनही मतदारसंघात आयटी कंपन्यांचा झालेला विस्तार, यामुळे चिंचवड, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढली आहे. ५ जानेवारीच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात पुरुष मतदार ४१ लाख ६६ हजार २६५ तर स्त्री ३७ लाख ८४ हजार ६६० इतके मतदार होते. त्या तुलनेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ८० लाख ७३ हजार मतदारांमध्ये ४२ लाख २५ हजार ९१८ इतके पुरुष तर ३८ लाख ४६ हजार स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या ४९५ वरून ५२४ पर्यंत वाढली आहे.

हडपसर, चिंचवड मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवडमध्ये सुमारे दहा हजारांनी पुरुष मतदारांची संख्या वाढली. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अन्य उर्वरित दहा मतदारसंघात सुमारे दोन ते सात हजारांच्या फरकाने प्रत्येकी महिला, पुरुष मतदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारसंघांची स्थिती

मतदारसंघ . ….५ जानेवारीची संख्या…२७ ऑक्टोबरची संख्या…. झालेली वाढ

कसबा………. २,७५,४२८……….२,७७,१७८…………..१७५०

शिवाजीनगर ……२,७४,१०३……….२,७६,५९४……………२४९१

कोथरूड ………३,९१,५२०………..३,९५,३८३…………३८६३

पर्वती…………३,३०,८१९ ………३,३४,४०९……………३५९०

हडपसर……….५,३६,६९७ ………..५,५१,१५६…………….१४,७५९

पुणे कन्टोन्मेंट ……२,६७, ४८०……….२,७०,९७४…………३४९४

वडगाव शेरी …….४,३३,०२२ ……….४,४४,८८४…….११,८६२

खडकवासला……५,०८,१७२………..५,१४,४०८………..६२३६

भोसरी…………५,१३,७६१………..५,२६,८५८…………१३०९७

चिंचवड……….५,६६,४१५ ………..५,८७,७३१……………..१९,३१६

पिंपरी ………….३,५७,२०७………...३,६३,८२९…………….६६२२

एकूण ………….७९,५१,४२० ……….८०,७३,१८३…………….१,२१,७६३

 

कोट

पुणे जिल्ह्यात भौगोलिक विस्तारामुळे सर्वच मतदारसंघाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे चिंचवड, हडपसर, वडगाव शेरीसह सर्व मतदारसंघातील मतदारसंख्येत वाढ झाली आहे. नवमतदारांचे भरून घेतलेले अर्ज, मयतांची केलेली पडताळणी यामुळे मतदार संख्येत वाढ झाली. तरुण मतदारांची संख्या वाढविण्यावर आता भर देणार आहोत.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: Maximum 19 thousand voters in Chinchwad, lowest in Kasab vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.