शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे एक लाखांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 11:31 IST

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून  पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे.

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून  पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड आणि लोकसंख्येने मोठा मानला जाणारा मावळ मतदारसंघ कायमच अवघड मानला जातो. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून बारणे यांनी आघाडी घेत ती टिकवली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती २००९ पासून झाली.त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदार संघात हा परिसर विभागला होता. मतदार संघ निर्मितीनंतर झालेल्या दोनही लोकसभा मतदार संघ मावळ शिवसेनेकडे आहेतेव्हापासून झालेल्या दोन निवडणूकींमध्ये हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. सुरुवातीला गजानन बाबर  आणि २०१४साली बारणे हेच तिथे विद्यमान खासदार होते. त्यानंतर राष्ट्रवादीने पार्थ यांना उमेदवारी दिल्याने लढत प्रतिष्ठेची बनली होती. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या  श्रीरंग बारणे यांना एक लाख आठ हजार १६० मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ३ लाख ४७ हजार ५४८ मतं मिळाली असून  पार्थ पवार यांच्या पारड्यात  मते २ लाख ३९ हजार ३८८ मिळाली आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३  मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९  टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या मतदार संघात ६०.११ टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना  ५ लाख १२ हजार २२६ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. 

टॅग्स :maval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९parth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस