शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:38 IST

माऊलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्याक्षिके घेतली जाणार

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळा रथासाठी निवड झालेल्या मानकऱ्यांनी  बैलजोडी खरेदी केली असून ‘सोन्या -मोन्या’ ही बैलजोडी आळंदीत दाखल झाली आहे. यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील रथाला आळंदीतील तुळशीराम भोसले व रोहित भोसले यांच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे. माउलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्याक्षिके घेतली जाणार आहेत.                 माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा येत्या ११ जुनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर भोसले कुटुंबीयांनी कर्नाटक राज्यातील राजापूर (ता. निपाणी) गावातील राजु गिरी यांच्याकडून ४ लाख रुपयांना 'सोन्या - मोन्याची' बैलजोडी विकत घेतली आहे. रविवारी (दि.७) ही मानाची बैलजोडी आळंदीत दाखल झाली. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते बैलांना औक्षण करून पूजा करण्यात आली. 

 दरम्यान बैलांच्या रोजच्या आहारात कडबा, मका, शेंगदाणा पेंड, वैरण ई. समावेश करण्यात येत आहे. तर गोठ्यात बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये या उद्देशाने गोठ्यात गादीदार वस्तुंचा वापर केला जात आहे. बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केली जाणार असून आवश्यक औषध लसीकरणही केले जाणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्याचे भाग्य आमच्या बैलांना मिळत असल्याने आम्ही आंनदी असल्याची भावना तुळशीराम भोसले, सागर भोसले व रोहित भोसले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAlandiआळंदीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022