माऊलींची पालखी परतली
By Admin | Updated: August 10, 2015 02:37 IST2015-08-10T02:37:08+5:302015-08-10T02:37:08+5:30
तब्बल एक महिन्याचा पायी प्रवास करीत, पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीनगरीत जंगी स्वागत करण्यात आले

माऊलींची पालखी परतली
आळंदी : तब्बल एक महिन्याचा पायी प्रवास करीत, पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीनगरीत जंगी स्वागत करण्यात आले .
पालखीसह लाखो वारकरी व भाविकांच्या सोबत टाळ-मृदंगाचा गजर करीत संतजनांचा मेळा आज अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखीमार्गावर स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखीमार्गावर औषधफवारणी करून व झाडून पालखीमार्ग स्वच्छ ठेवण्यात आला होता.
पालखी विश्रांतवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना समजताच भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी पायी चालत जाऊन स्वागत केले. तर पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच येथेही भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. (वार्ताहर)