नगरसेविकेचा विनयभंग, जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: May 24, 2014 05:14 IST2014-05-24T05:14:38+5:302014-05-24T05:14:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेला शिवीगाळ, गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेविकेचा विनयभंग, जिवे मारण्याची धमकी
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेला शिवीगाळ, गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही नगरसेविकेने केला आहे. हा प्रकार सांगवीमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला होता. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पीडित नगरसेविकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शेखर बबन शितोळे, सरोज बबन शितोळे आणि शेखर यांच्या दोन बहिणी (सर्व रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ‘तुम्ही येथे रस्त्यावर का उभे राहिलात, हा रस्ता तुमच्या बापाचा आहे का?’ असे म्हणत शितोळे कुटुंबीयांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विनयभंग केला. चाकूचा धाक दाखवून तुमच्या कुटुंबाचा खात्मा करून टाकीन, अशी धमकीही दिली. तसेच संबंधित नगरसेविकेच्या घराकडे जाणार्या रस्त्यावर टेम्पो आडवा लावला, असे संबंधित नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, असे उपनिरीक्षक ए. टी. व्यवहारे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)