शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासातून आपण काय शिकतो हे महत्वाचे : लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:05 IST

इतिहासात आपण अनेकदा अडकून पडतो. त्या इतिहासाचे संशोधनात्मक दृष्ट्या अनुकरण करण्यात आपण कमी पडतो.

ठळक मुद्देनिवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे लिखित  ‘या सम हा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘‘पाश्चिमात्य इतिहासकारांनी भारतीय योध्दयांचे तोंड भरुन कौतुक केले असे फार कमी वेळा दिसून येते. बाजीराव पेशवा याला काही प्रमाणात अपवाद म्हणावा लागेल. इतिहासात आपण अनेकदा अडकून पडतो. त्या इतिहासाचे संशोधनात्मक दृष्ट्या अनुकरण करण्यात आपण कमी पडतो. वेगवेगळे योध्दे का यशस्वी झाले? त्यांच्या विजयामागील कारणे काय? याचा अभ्यासूपणाने विचार करावा लागेल. इतिहासातून आपण काय शिकतो. हे जास्त महत्वाचे आहे,’’ असे मत भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. मेजर जनरल शशिकांत पित्रे लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित बाजीराव पेशव्यावरील ‘या सम हा’ या पुस्तकाचे प्रकाशन नरवणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. सिम्बबायोसिसच्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवृत्त वायुसेना प्रमुख एअरचीफ मार्शल प्रदीप नाईक, लेफ्टनंट जनरल जयंत पाटणकर व डॉ. श्रीकांत परांजपे व राजहंस प्रकाशनचे आनंद हर्डीकर उपस्थित होते. नरवणे म्हणाले, ‘‘आपल्याला प्रेरणादायी इतिहास आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करुन त्यापासून भविष्यात सर्जनशील कृती करण्याची गरज आहे. केवळ स्मरणरंजनात न जाता आपल्या हातून भरीव कामगिरी कशी होईल याकडे लक्ष द्यावे लागेल.  इतिहासात अनेक योध्दे यशस्वी का झाले त्यांना आलेल्या अपयशाच्या त्यांच्या यशात कितपत वाटा आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. त्यातून आपल्या रोजच्या जगण्याच्या लढाईला बळ मिळणार आहे. आपल्याकडे मौखिक इतिहासामुळे अनेक मौलिक गोष्टी नाहीशा झाल्या. त्याचे लेखन पुन्हा न झाल्याने तो इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे प्रत्यक्ष रणांगणावर काय झाले? तेथील परिस्थिती याचे प्रत्ययकारी वर्णन सापडणे कठीण जाते.’’ यावेळी नरवणे यांनी  बाजीरावाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु उलगडले. नाईक म्हणाले, बाजीरावाचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. केवळ ताकदच नव्हे तर त्याने अचाट बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक राज्ये जिंकुन घेतले. बाजीरावाची युध्दनीती हा देखील स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्याचे युध्दकौशल्य अतुलनीय होते. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 39 लढाया केल्या. त्या सर्व जिंकल्या यावरुन त्याची महानता स्पष्ट होते. 

टॅग्स :Puneपुणेmanoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानhistoryइतिहास