शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आयटी पार्कची समस्या दूर करण्यासाठी ‘मास्टर प्लान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:21 AM

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येत ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे.

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येत ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महापालिका, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रस्त्यांच्या रुंदीकरणासह नव्या पुलांची निर्मिती, बहुमजली पार्किंगची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.हिंजवडीची कोंडी फोडण्यासाठी विविध यंत्रणांच्या अधिकाºयांची जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती. राव म्हणाले, ‘हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते अरुंद आहेत. दर दिवसाला दोन लाख लोकांकडून येथील रस्त्यांचा वापर केला जातो. येथील कोंडी दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी १५ सप्टेंबर रोजी अधिकाºयांसह या भागाची पाहणी केली होती. या भागामध्ये नवीन रस्ते तयार करणे आवश्यक असून, उपलब्ध रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांसोबतच वॉर्डनची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. या सर्व बाबींचा विचार करून या भागांत सुधारणा करण्यासाठी विविध यंत्रणांकडून कामे सुरू आहेत.हिंजवडीमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. या ठिकाणच्या कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते त्यांची वाहने रस्त्यावरच लावतात. त्यामुळे कोंडीमध्ये आणखीनच भर पडते. या भागात बहुमजली पार्किंग उभारण्यात येणार असून, त्यासाठी एमआयडीसीची १२ हजार चौरस मीटरची जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंजवडी औद्योगिक प्राधिकरणाच्या आर्किटेक्टकडून त्याचे डिझाइन तयार करुन घेतले जाणार आहे. माण-म्हाळुंगे आणि हिंजवडी भागातील घनकचºयाची समस्या मोठी आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार सतत येत असतात. एमआयडीसीने यामध्ये पुढाकार घेऊन दोन भागांत कचरा वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. औद्योगिक आणि सेंद्रिय कचºयावर प्रक्रियेसाठी दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. यासाठीची फाईल अंतिम मंजुरीसाठी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविण्यात आलेली आहे. एमआयडीसीकडून नांदे-चांदे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, हे काम ५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तर माण गावामधून आयटी पार्ककडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत आहे. त्याच्या कामाची गती समाधानकारक असून, माण गावातील अरुंद आणि कमी उंची असलेला पूल पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नव्याने चारपदरी पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी दोन महिने या भागातील वाहतूक बंद करून ती अन्य रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे. त्यासाठी अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. पीएमआरडीएमार्फतही या भागातील काही रस्ते विकसित करण्यात येत आहेत. ज्या भागात टीपी स्किम जाहीर झालेली आहे, या भागातील बाधित होणाºयांची नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली असून, त्यांनी ही स्किम स्वीकारल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पीडब्ल्यूडीच्या योजनेमधून रस्त्यांचे काम सुरू आहे. म्हाळुंगे-नांदे-चांदे-घोटावडे, सूस-नांदे, पिरंगुट-घोटावडे-राजीव गांधी आयटी पार्क (हिंजवडी) हे तीन रस्ते पीडब्ल्यूडीमार्फत तयार करण्यात येणार आहेत. या कामासाठी निधी उपलब्ध असून, निविदा प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. २५ जानेवारी २0१८ पर्यंत हे काम सुरु होईल. यासोबतच नवीन सिग्नल, बीआरटी मार्ग, दुभाजक बंद करणे अशीही कामे करण्यात येणार आहेत.>हिंजवडी आयटी पार्कची सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या भागात सीसीटीव्ही बसविण्यासाठी एमआयडीसीने ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. हे सीसीटीव्ही भविष्यात पुणे पोलिसांच्या सीसीटीव्ही यंत्रणेशी जोडले जाणार आहेत. सीसीटीव्हींसंदर्भात पोलिसांचा अहवाल मागविण्यात आला असून, हा अहवाल १५ दिवसांत अपेक्षित आहे.माण गावामधून जाणाºया मुळा नदीवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांसोबत या भागाचीही पाहणी केली होती. २६ जानेवारीला या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन मार्ग तयार होणार आहे. या भागातील ४00 मीटरच्या रस्त्यावरील त्रुटी दूर होण्यास मदत मिळणार आहे. बाणेर-हिंजवडी असा हा रस्ता असणार आहे. २८ तारखेपर्यंत त्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पात बाधित होणाºयांनी आर्थिक मोबदल्यापेक्षा टीडीआर आणि एफएसआय वाढवून देण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यातील तांत्रिक बाबी पूर्ण करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.हिंजवडीतील बीआरटी मार्गामधून या भागात कर्मचाºयांची वाहतूक करणाºया कंपन्यांच्या खासगी बसना परवानगी दिली जावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. वाहतूक पोलिसांनीही हा पथदर्शी प्रयोग म्हणून राबवायला हरकत नसल्याचे म्हटले़

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंग