शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

स्मार्ट सिटीवर मनसेचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 2:57 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. रोज एक आरोप करत त्यांनी कंपनीच्या कामकाजावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. रोज एक आरोप करत त्यांनी कंपनीच्या कामकाजावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्याबरोबरच आता त्यांनी कंपनीतील नियुक्त्या, कामकाज यावरही बोट ठेवण्यास सुरुवात केली आहे.मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, कंपनीच्या कार्यालयात अधिक्षक, वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक, फोटोग्राफर, सिव्हिल इंजिनिअर अशा जागांची जाहिरात देऊन आॅक्टोबर २०१७ मध्ये ११ महिन्यांसाठी रीतसर भरती करण्यात आली. आॅक्टोबर २०१८ मध्ये या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा महिनाभर कामावर घेण्यात आले. आता आॅक्टोबरच्या शेवटच्या दिवशी त्यांना एका खासगी कंपनीमार्फत अर्ज करण्यास सांगितला आहे. या कंपनीमार्फत अर्ज केल्यावर पूर्वीप्रमाणे कामावर येण्यासही सांगितले आहे. ही मध्यस्थ कंपनी कुठून आली, असा प्रश्न मनसेने विचारला आहे. त्या कंपनीचे कर्मचारी घेण्यापूर्वी निविदा जाहीर करण्यात आली होती. त्यांचे वेतन कोणी ठरवले, त्यांनाच कामावर घ्यायचे, असा निर्णय कसा घेतला, त्याचे निकष काय, या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेSmart Cityस्मार्ट सिटी