शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त ग्रंथालयांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मसापचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 19:10 IST

महापुरात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचन संस्कृती समृद्ध करणारी छोट्या छोट्या गावातील तसेच शहरातीलही ग्रंथालये जलमय झाली...

ठळक मुद्दे; ग्रंथ देण्याबरोबरच पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन

पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचन संस्कृती समृद्ध करणारी छोट्या छोट्या गावातील तसेच शहरातीलही ग्रंथालये जलमय झाली. हजारो पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. ही ग्रंथालये पुन्हा पुस्तकांनी फुलून जाण्यासाठी आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी  महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'पूरग्रस्त भागातली ही ग्रंथालये पुन्हा ग्रंथांनी भरून जावीत यासाठी साहित्य परिषदेतर्फे ग्रंथ दिले जाणार आहेतच. तसेच पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथवितरक आणि साहित्यप्रेमींना करीत आहोत. हे ग्रंथ त्या वाचनालयापर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. 

अशी देता येईल पुस्तकसाथ * साहित्यिक, साहित्यप्रेमी, प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी आपल्या इच्छेनुसार पुस्तके रविवार आणि सुटीचा दिवस सोडून सकाळी ९.३० ते १२ आणि दुपारी ४. ३० ते ८ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात सेवकांकडे द्यावीत. आपण देत असलेल्या पुस्तकांची यादी स्वत: तयार करून आणावी आणि साहित्य परिषदेकडून पोच घ्यावी.*  टपालाद्वारे ग्रंथ पाठविणा-यांनी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे - ४११०३०. या पत्त्यावर पाठवावीत. पाकिटावर 'पूरग्रस्त ग्रंथालयासाठी' असा उल्लेख करावा.* जीर्ण, खराब झालेली पुस्तके किंवा पाठयपुस्तके पाठवू नयेत.* जुनी मासिके आणि दिवाळी अंकांचा स्वीकार केला जाणार नाही.* इच्छुकांना  पुस्तक मदतीसाठी दि. २१ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.* त्यानंतर हे ग्रंथ संबंधित ग्रंथालयांकडे साहित्य परिषदेतर्फे सुपूर्द करण्यात येतील. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदfloodपूरkolhapurकोल्हापूर