शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जाळून टाकीन; पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:21 IST

तुझे वय १८ वर्षे होईपर्यंत मी वाट पाहीन, पण माझ्याशीच लग्न कर,अशी धमकी आरोपी फिर्यादीला सतत देत होता.

पुणे: वारंवार ‘आय लव्ह यू बोलून, तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जाळून टाकण्यात येईल, असे सांगत चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मोहम्मद हुसेन खान ( ४५ ,रा.सय्यदनगर, येरवडा ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर मुलीचे शिक्षण ९ वी पर्यंत झाले असून, सध्या ती घरीच असते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही १६ वर्षांची आहे. ती आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. त्याने तिच्या घरामध्ये स्वत:च्या मोबाईल नंबरची चिठ्ठी फेकून फोन करायला सांगितले अन्यथा चेह-यावर अँसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच तो येता जाता फिर्यादीला ’आय लव्ह यू’ बोलून तिचा पाठलाग करुन घाबरवत होता. तू माझ्याशी लग्न कर नाही, तर तुला जाळून टाकीन, तुझे वय १८ वर्षे होईपर्यंत मी वाट पाहीन, पण माझ्याशीच लग्न कर,अशी धमकी तो तिला सतत देत होता. दरम्यान, सतत होत असलेल्या त्रासाला घाबरून तरुणीने हा प्रकार कुटुंबाच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस