शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषातून पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:41 IST

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीचा मित्र व त्याच्या मित्राने अत्याचार केला. तसेच पीडित विवाहितेस व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देनोकरीच्या आमिषातून पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार एका आरोपीस अटक : पतीचा मित्र व त्याच्या मित्राने केला अत्याचार 

पिंपरी : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीचा मित्र व त्याच्या मित्राने अत्याचार केला. तसेच पीडित विवाहितेस व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. १ ते ३ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक भोगील (रा. पावडे वस्ती, हडपसर), विष्णू व अतुल अशी आरोपींची नावे आहेत. विवेक भोगील याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. 

आरोपी अतुल हा पीडितेच्या पतीचा मित्र आहे. तुम्हाला चांगली नोकरी लावून देऊ, असे आमिष दाखवून त्या बहाण्याने आरोपी अतुल याने विवाहितेला गोवा येथे नेले. तेथे अतुल व त्याचा मित्र विष्णू यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा दुसºया दिवशी गोवा येथून कात्रज येथे त्यांच्या मित्राच्या घरी नेले व त्याठिकाणी विवेक भोगील याने विवाहितेवर अत्याचार केला. त्यानंतर विवाहितेला कात्रज रोडवर सोडून दिले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिप