विवाहितेची जाळून घेऊन आत्महत्या

By admin | Published: March 4, 2017 02:35 AM2017-03-04T02:35:33+5:302017-03-04T02:35:33+5:30

बाळापूर येथील घटना.

Married to suicide | विवाहितेची जाळून घेऊन आत्महत्या

विवाहितेची जाळून घेऊन आत्महत्या

Next

बाळापूर (जि. अकोला), दि. ३- शहरातील वजिराबाद परिसरातील २४ वर्षीय विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर येथील रुखसानाबी यांचा बाळापूर शहरातील वजिराबाद परिसरात राहणार्‍या मो. फिरोज यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर पती नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत असे. वारंवार माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत होता, तसेच यासाठी मारहाणही करायचा. पती कुठलेही काम करीत नसे. यापूर्वी सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांत दोन वेळा तक्रार देण्यासाठी गेली होती; परंतु समजावून तिला परत आणले होते. शुक्रवारी सासरच्या मंडळींचा त्रास सहन न झाल्याने रुखसनाबी यांनी सकाळी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. जळत असताना त्या घराबाहेर येऊन पडल्या. त्यांना कुणीही विझविण्याचा प्रयत्न न केल्याने त्या १00 टक्के जळाल्या. त्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक विवाहितेचे वडील अ.रफीक शे.बिसमिल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी विवाहितेचा पती मो.फिरोज मो.युसूफ, जेठ मो.जाकीर मो.युसूफ व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध कलम ३0४, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे करीत आहेत.

Web Title: Married to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.