शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

भाषेच्या अज्ञानामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही : डॉ. प्र.चिं शेजवलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:02 IST

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देचांगल्या प्रकारे साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांची मसाप कडून दखल नाही

पुणे :  माध्यमातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. हे चित्र असताना देखील ज्ञानात भर घालणा-या विविध पुस्तकांचे, ग्रंथांचे प्रकाशन सोहळे सातत्याने होत आहेत. तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून मान्यवर लेखकांची दखलच घेतली जात नाही. परिणामी भाषेचे ज्ञान न मिळाल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होत नसल्याची खंत मसापचे माजी अध्यक्ष डॉ.प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे ' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेजवलकर बोलत होते. या कार्यक्रमाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक  व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रणती टिळक, प्राचार्य डॉ. संजय कंदलगावकर, डॉ. हेमंत अभ्यंकर, साकेत प्रकाशनच्या प्रतिभा भांड आदी उपस्थित होते. दरम्यान, व्यवस्थापन विभागातर्फे अनेक स्पर्धा घेण्यात आल्या असून,विजेत्यांना गौरविण्यात आले. शेजवलकर म्हणाले, डॉ. राशिंगकर याचे अनेक ग्रंथ, पुस्तके वाचनीय आहेत. परंतु, त्यांसारखे अनेक लेखक चांगल्याप्रकारे साहित्य क्षेत्रात आपले योगदान देत आहे. परंतु, मसापसारख्या संस्थेकडून त्यांची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नाही असा आरोपही शेजवलकर यांनी केला. वॉरन बफे या व्यक्तीने वयाच्या १२ व्या वर्षी रिकाम्या बाटल्या विकून पैसा कमावला. परंतु, त्या पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे हे त्यांनी तेव्हाच जाणले म्हणून त्यांची जगातले तिसरे श्रीमंत अशी ख्याती मिळवली. मात्र, एवढा पैसा कमावून अखेरच्या श्वासाला सर्व संपत्ती आपले स्वत:च्या नावे जाहीर न करता समाजासाठी दान केली. असा उदारमतवादीपणा देखील त्यांच्या अंगी असून तरुणांनी त्यांची तत्व आचरणात आणावीत असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. टिळक यांनी सांगितले, ज्ञान देणारी पुस्तके तरुणांना सहज उपलब्ध होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तरुणांनी अशा पुस्तकांसोबत सहवास वाढवून जीवनात वेळोवेळी त्याचा फायदा घेतला पाहिजे.-------------आपलेच दात आपलेच ओठ  मी जेव्हा मसापच्या अध्यक्षपदी होतो तेव्हा अनेक गोष्टी घडल्या, पाहिल्या पण काय करायचे आणि काय करायचे नाही या पथ्यानुसारच कार्य केली. पण सध्या मसापची अवस्था पाहता आपलेच दात आणि आपलेच ओठ असे म्हणत डॉ. प्र.चिं शेजवलकर यांनी मसापच्या पदाधिका-यांना टोला लगावला.

टॅग्स :PuneपुणेTilak Maharashtra Universityटिळक महाराष्ट्र विद्यापीठMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद