शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘मराठी आॅलिम्पियाड’ला इंग्रजी शाळांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:03 IST

एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत.

नम्रता फडणीसपुणे : एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत. हे असेच घडत राहिले तर एक दिवस मराठी भाषा लुप्त होईल की काय अशा नानाविविध शंका उपस्थित केल्या जात असताना ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’च्या अभिनव प्रयोगाने मात्र हा गैरसमज पूर्णत: खोडून काढला असून, मराठी भाषाप्रेमींना एक आशेचा किरण दाखवला आहे.विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून भाषा संस्थेनेसुरू केलेल्या ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’ स्पर्धेला इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९00 विद्यार्थी या आॅलिम्पियाड’च्या परीक्षेला बसले असल्याची माहिती मिळाली आहे.मराठी भाषेमध्ये कसदार लिहिती-वाचती पिढी निर्माण व्हावी यासाठी भाषा संस्थेतर्फे २0१५मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलिम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली.पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या होती केवळ ५00. तीन वर्र्षांंमध्ये ही संख्या १९00वर पोहोचली. ही नक्कीच मराठी भाषेसाठी शुभवार्ता म्हणावी लागेल. या अभिनव प्रयोगाविषयी भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.त्या म्हणाल्या, भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रुजावे या दृष्टीने या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.या स्पर्धेतून मुलांची भाषिक बुद्धिमत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी आणि सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून, ज्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजना आणि कौशल्य या चार घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या भाषिक आकलनाबरोबरच भाषण, संवाद आणि नवनिर्मिती क्षमता या निकषांवर आधारित प्रश्नांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. शब्दांशी खेळत भाषेचे सहजसोप्या पद्धतीने आकलन करून देणे हा या स्पर्धेचा गाभा आहे. या स्पर्धेला पालकांसह, शाळा आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर पाहिल्यानंतर मुलांना मराठीमध्ये साधी वाक्येही व्यवस्थित लिहिता येत नसल्याचे दिसून आले आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच शाळेमधील मराठी अभ्यासक्रमावर आधारित साचेबद्ध परीक्षेचे स्वरूप न ठेवता मुलांना भाषेबरोबर खेळता आले पाहिजे अशी स्पर्धेची बांधणी करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून मुलांचा भाषिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Schoolशाळा